
कल्याण, दि. ३० ऑगस्ट, चित्रलेखा रासने(प्रतिनिधी) :
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने गणरायाचे आगमनाची तयारी जोरदार सुरू झाली आहे.कोरोना मुले लागलेले निर्बंध माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उठवल्याने गणेश भक्ताच्या आनंदाला जणू उधानच आले आहे. रविवारी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली होती. गणराया साठी बाजारात मखर, सजावट, दिवे, फुलांचे तोरण, गौरीच्या सजावटीसाठी लागणारे साज, अशे एक ना अनेक वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची रेलचेल दिसून येत आहे. विविध पाच रंगातील तोरणांना यंदा विशेष पसंती आहे. विजेचे साहित्य दुकानात सजावटीसाठी विविध इलेक्ट्रॉनिक तोरण खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल दिसून येत होता.80 रुपये मिटर ते 160 मिटर रुपयांपर्यंत त्यांचा दर आहे. महागाई ची झळ आहे पण आपल्या आवाक्यात बसेल अशी सूंदर खरेदी केली जात आहे.आकर्षक, पर्यावरण पूरक मखरांची नोंदणी केली जात आहे. बाजारात विविध प्रकारची फुले, अगरबत्ती, काही ठिकाणी मिठाई, उकडीचे मोदक, विविध प्रकारचे ड्रायफ्रूट या सर्व दुकानांमध्ये आगाऊ ऑर्डर नोंदणी करण्यात आलेली आहे. वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या नागरिकांनी खरेदी केलेले समान घेऊन रिक्षासाठी तिष्ठत राहण्याची वेळ आली. काही जणांनी मोठ्या प्रमाणात दुकानांत जाण्यापेक्षा रस्त्यावर थाटलेल्या विक्रेत्यांकडे साहित्य खरेदी करत आहे. 2 वर्षे कोरोनात गेल्याने विविध वस्तुंची विक्री न झाल्याने तुरळक व्यापरांकडे काही नवीन वस्तू विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसले. बहुतांश ठिकाणी जुन्या पॅटर्न च्या वस्तू आहेत. खरेदी झाल्यावर अनेकांसाठी पोट पूजेसाठी विविध हॉटेल्स, स्नॅक्स सेंटर कडे आपला मोर्चा वळवला. थोडक्यात सगळ्यांचा आनंद अगदी बापाच्या आतुरतेचि वाट पहात आहे.

