सॅन फ्रान्सिस्को : 3 डिसेंबर(प्रतिनिधी)
भारताचे राजदूत तरणजीत सिंह सिंधू यांनी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गूगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना देशाचा सर्वोच्च नागरि पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मभूषणने सन्मानित केले.
संधू यांनी ट्विटरवर म्हटले की, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गूगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाईंना पद्मभूषण प्रदान करून आनंद झाला. मदुराईपासू माउंटेन व्यूपर्यंत सुंदर यांचा प्रेरणादायी प्रवास भारत-अमेरिकेदरम्यान आर्थिक आणि औद्योगिक संबंध मजबूत आणि भारतीय प्रतिभेची
अमेरिकेत भारतीय दूतावासाकडून प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सुंदर पिचाई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं की, ‘पद्म भूषण दिल्याबद्दल भारतीय राजदूत संधूंना धन्यवाद देऊ इच्छित आहे. त्यासाठी ते भारत सरकार आणि भारतीयांचे खुप आभारी आहेत.’
सुंदर पिचाई म्हणाले की, ‘भारत हा त्यांचा भाग आहे. तो जिथे जातो तिथे सोबत घेऊन जातो. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, शिकलेल्य कुटुंबात वाढलो हे माझे भाग्य आहे. माझी आवड जोपासण्यासाठी त्यांच्या पालकांनी खूप त्याग केला.’
50 वर्षीय पिचाई यांनी पुरस्कार स्विकारताना सांगितले की, ‘तांत्रिक परिवर्तनाची गती पाहण्यासाठी भारतात येणे अश्चर्यकारक असते. भारतात डिजिटल पेमेंटपासून व्हॉईस तंत्रज्ञानापर्यंत केलेले बदल जगभरातील लोकांना फायदेशीर आहेत. तंत्रज्ञानाचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र काम करत असताना गूगल आणि भारत यांच्यातील उत्तम भागीदारी सुरू ठेवण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.’
पंतप्रधान मोदींचा डिजिटल इंडियाचा दृष्टीकोन निश्चितच त्या प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरला आहे आणि मला अभिमान आहे की गुगलने भारताला अधिक चांगले बनवण्यासाठी दोन दशकांमध्ये सरकार, व्यवसाय आणि समुदायांसोबत भागीदारी केली आहे. आमच्या घरापर्यंत पोहोचणार्या प्रत्येक नवीन तंत्रज्ञानाने आमचे जीवन चांगले बनवले आहे आणि त्या अनुभवाने मला गूगलवर आणि जगभरातील लोकांचे जीवन सुधारणारे तंत्रज्ञान तयार करण्यात मदत करण्याची संधी दिली आहे.
